कोल्हापूरच्या युवतीवर, लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार!

कोल्हापूर:  कोल्हापुरातील एका युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आला. ही युवती कोल्हापूर येथे शासकीय नोकरीत कार्यरत आहे. अत्याचार करणारा आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या दोघांवर बलात्कार आणि अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सचिन संभाजी गायकवाड (वय 25 रा.घुणकी,ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर) आणि अमोल कुरणे (रा. कुंडलवाडी, ता. वाळवा, जिल्हा. सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
पीडीत युवतीस लग्नाचे आमिष दाखवून ओळख वाढवली. त्यानंतर सांगली येथील परिसरात तिला वारंवार नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर पीडितेने लग्नाबद्दल विचारले असता सचिनने जातीचे कारण सांगून नकार दिला. त्यानंतर तिने सचिनच्या नातेवाईकांशी संपर्क साधला त्यावेळी अमोल कुरणे यांने तूझे सचिन सोबत लग्न होणार नाही,त्या बदल्यात आम्ही तुला एक लाख रुपये देतो, असे सांगितले फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडीतेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव करत आहेत.