मुंबई : केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाख मध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय ,मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या पाच जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार झांस्कार ,द्रास,शाम,नुब्रा आणि चांगथांग या पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मिती करण्यात आली आहे.
सध्या लडाख मध्ये लडाख आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत, केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयानंतर लडाख मध्ये जिल्ह्यांची संख्या वाढून सात झाली आहे. शासकीय व्यवस्था भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.