मुंबई = महाराष्ट्रात वाढत असलेली गुन्हेगारी, महिलावरील वाढत असणारे अत्याचार या विरोधात विरोधकांकडून सरकारला धारेवर धरण्यात येतेय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे.तर जयंत पाटील यांनी हे सरकारचं अपयश असून एका व्यक्तीला दोष देता येणार नाही असे ते म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, आमदारांना सुरक्षित वाटत नसेल तर या महाराष्ट्राची परिस्थिती काय झालेली आहे हे बघा.त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राजीनामा द्यावा. राज्यात महिलाही सुखरूप नाहीत, नेतेही सुरक्षित नाहीत त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र …..अशी म्हणण्याची वेळ आली आहे.असं सांगत रोहित पवार यांनी फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर जयंती पाटील म्हणाले की, हे अपयश कुणा एकाच नाही तर संपूर्ण सरकारचे आहे. त्यामुळे एका व्यक्तीला दोष देता येणार नाही मुख्यमंत्र्यापासून सगळं सरकार महाराष्ट्रात अपयशी ठरलं आहे. महिलांना, बालकांना ते संरक्षण देऊ शकत नाहीत. त्यामुळे एका व्यक्तीला दोष देऊन राजीनामेला काही अर्थ नाही असेही ते म्हणाले.
