मुंबई: आम आदमी पार्टीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीने महाविकास आघाडीत सामील आम्ही झाली होती. परंतु त्यांना एकही जागा मिळाली नव्हती .

त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने महाराष्ट्रातील सर्व 288 जागा लढवणार आहेत, अशी माहिती पक्षाचे राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे पाटील यांनी दिली.
परभणी विधानसभा मतदारसंघातून आपने उमेदवार जाहीर केला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोरे ,बीड विधानसभा मतदारसंघातून अशोक येडे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आधीच जाहीर करण्यात आला आहे.
