रोहित पवार कार्यकर्त्यांना नोकरा प्रमाणे वागवतात: ज्येष्ठ नेत्याने आरोप करत पक्ष सोडला

राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी जामखेड मतदारसंघातून रोहित पवारांना मोठा धक्का दिला. रोहित पवार कार्यकर्त्यांना नोकराप्रमाणे वागवतात, कार्यकर्ता जिवंत राहू नये. अशी त्यांची कार्यपद्धती आहे असा आरोप राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या राळेभात यांनी केला.

 


राळेभात म्हणाले की, गेली तीस वर्ष मी शिवसेनेचे काम केले आहे. त्यानंतर मी राष्ट्रवादीत प्रवेश केला .रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आणि रोहित पवारांना निवडून सुद्धा आणलं. परंतु रोहित पवार यांची काम करण्याची पद्धत तसेच कार्यकर्त्यांना वागवण्याची पद्धत मला खटकली. आमदार रोहित पवार कधीही लोकांना भेटत नाहीत, आमदारांना फोन केला उचलला जात नाही त्यामुळे लोकांना स्थानिक आमदार हवाय .कार्यकर्त्यांनी आमदाराला फोन केला तर उचलला जात नाही ही कार्यपद्धती चुकीची आहे असेही मधुकर राळेभात यांनी म्हटलं.
मला कुणी उमेदवारी दिली तर मी निवडणूक लढवण्यास तयार आहे. परंतु मी अपक्ष निवडणूक लढवणार नाही असेही ते म्हणाले.

🤙 8080365706