कोल्हापूर: शिंदे सेना व भाजप या महायुतीमध्ये कोल्हापूरच्या उत्तर जागेवर कोण लढणार याबद्दलचे दावे केले जात आहेत.ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत.

त्यामुळे कोल्हापूर उत्तर ची जागा शिंदेसेनेला जाण्याची शक्यता ठळक झाली आहे. असे झाल्यास नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे महायुतीचे उत्तरच्या मतदारसंघातील उमेदवार असू शकतात.
