‘शिंदे गटातील’ दोन नेत्यांमध्ये हाणामारी

मुंबई: राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व राजकीय पक्ष करत आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन नेत्यांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दिंडोशी विभाग प्रमुख आणि शाखाप्रमुख यांच्यात हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या हाणामारीचा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये हे दोन नेते एकमेकांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करताना तसेच मारामारी करताना दिसत आहेत.
लेटर डिस्पॅच करण्यावरून या दोन नेत्यांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. शाखाप्रमुख संतोष लाड यांच्या कार्यालयात येऊन विभाग प्रमुख नितीन स्वामीकडून लाड यांच्या कार्यकर्त्याला शिविगाळ केली, यानंतर राग अनावर होत संतोष लाड यांनी नितीन स्वामी यांना मारहाण केली.

🤙 9921334545