मुंबई: देशभरात महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे.कोलकत्ता येथे घडलेल्या घटनेतून अजूनही देश सावरलेला नाही. त्यात कोलकत्ता मधून आणखी एक घटना समोर येतेय.
कोलकत्ता मधील लोकप्रिय बंगाली अभिनेत्री पायल हिच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. याबाबतची माहिती तिने व्हिडिओ शेअर करत दिली.
या व्हिडिओमध्ये तिने सांगितले आहे की, 23 ऑगस्ट रोजी ती एका गर्दीच्या ठिकाणी गेली होती, तिथे तिच्या गाडीचा आणि दुचाकीस्वाराचा छोटा अपघात झाला.त्या व्यक्तीला किंवा त्याच्या गाडीला कुठेही नुकसान आणि दुखापत झालेली नव्हती. मात्र त्या माणसाने पायलला गाडीतून बाहेर येण्यास सांगितले परंतु ती गाडीतून बाहेर न आल्यामुळे त्यांनी तिच्या गाडीची काच फोडली त्यामुळे त्या अभिनेत्रीला दुखापत झाली. जर एका महिलेला रात्रीच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी अशाप्रकारे त्रास दिला जात असेल आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं जात असेल तर ही बाब चिंताजनक आहे