कोल्हापूर: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यात येणार होतं,मात्र उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हा बंद मागे घेण्यात आला. त्या ऐवजी कोल्हापूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला.
मूक मोर्चा वेळी पत्रकारांशी सवांद साधताना सतेज पाटील म्हणाले की, बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून बंद पुकारण्यात आला होता. मात्र हा बंद उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मागे घेण्यात आला. महायुतीचे सरकार हे फेल ठरलं आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन संपूर्ण राज्यांमध्ये केलं आहे. किमान आता तरी शासनाला जाग यावी आणि आरोपीला शिक्षा व्हावी.
या गुन्ह्यात सामील असणाऱ्या सर्वांना शासन शिक्षा करणार का ? असा सवाल ही सतेज पाटील यांनी उपस्थित केला.