सांगली :मुख्यमंत्री लाडकी बहीण या कार्यक्रमासाठी गुरुवारी मिरजेतून वीस बसेस कोल्हापुरात पाठवण्यात आल्या यामुळे मिरजेमध्ये बसचा तुटवडा होऊन प्रवाशांची गैरसोय होत असल्याची तक्रार करीत शिवसेना ठाकरे गटाने बस स्थानकात आंदोलन केलं.
यावेळी, प्रवाशांची गैरसोय केल्याबद्दल बसेस वर लावलेल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या छायाचित्राला काळे फासून निषेध करण्यात आला.शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात वाद झाला यावेळी ठाकरे गटाचे चंद्रकांत मेंगोरे, किरण कांबळे ,महादेव हुलवान यांना ताब्यात घेतले.