छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून युवतीने केली आत्महत्या!

सांगली: येथील महाविद्यालयीन युतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्रकार खंडेराजुरी येथे घडला.सतत होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून युतीने आत्महत्या केली. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशिरा आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयित साहिल बबन डबेदार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तरुणीने 17 ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले होते. तिला अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता, तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मुलीच्या वडिलांनी मुलीला आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी साहिल बबन टफेदार याच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात गुरुवारी तक्रार दिली. संशयित तरुणांकडून वारंवार मुलीची छेड काढली जात होती. बस स्थानक परिसरात मुलीच्या मागे फिरत होता. याबाबत संशियताच्या पालकांना सांगून, ताकीद सुद्धा देण्यात आली होती. मात्र काही दिवसांनी तो परत त्रास देऊ लागला. यामुळे मानसिक त्रास दिल्याने मुलींनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

🤙 9921334545