मुंबई = शेतकरी प्रश्नावर आक्रमक झालेल्या रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला होता.
राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांना दरवाढीसाठी, ते वर्षा बंगला येथे आंदोलन करणार होते, मात्र आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलना आधीच मरीन लाईन्स पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पण सरकारला हे महागात पडेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.