दिरानेच केला भावाच्या पत्नीचा खून !

 पुणे :गुन्ह्यांच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील केशवनगर परिसरातील ही घटना असून भावाच्या पत्नीचा किरकोळ वादातून दिराने खून केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचं नाटक करून रुग्णालयात दाखल केलं. पण शविच्छेदन केल्यानंतर हा अकस्मिक मृत्यू नसून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 

 

कविता नागराज गडदर असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, या प्रकरणी कविता नागराज गडदरचा दीर मल्लिकार्जुन शरणाप्पा गडदर (वय३५) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडदर हे कर्नाटकाचे आहेत.गेल्या काही वर्षापासून ते पुण्यात वास्तवात आहेत. आरोपी मल्लिकार्जुन हा त्याच्या भावाचे घरी राहायला होता. तो काही काम धंदा करत नव्हता तसेच त्याला दारूचे व्यसन देखील होते. दारू पिण्यावरून मल्लिकार्जुन आणि कविता यांच्यात वाद झाला. मोठा भाऊ आणि मयत कवितेचा पती गावी कर्नाटकला गेला होता. घरी आरोपी , मयत कविता आणि त्यांची दोन मुले होती. आरोपी आणि मयत कविता यांच्यात भांडण झालं होतं .आरोपीने कविता ला शिवीगाळ काय केली, त्यानंतर कविता यांनी कानाखाली मारली याचा राग मनात धरून गडदरे कवितेचा खून केला. त्यानंतर ती बेशुद्ध सापडल्याचा बनाव केला                    कवितेचा मृतदेह शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात नेण्यात आला. पोस्टमार्टम मध्ये कवितेचा खून झाल्याचे निदर्शनास आले . त्यानंतर पोलिसांनी गडदरेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत

🤙 9921334545