शेतात विक्रीसाठी आणून ठेवलेला गांजा जप्त ;

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथील वायदंडे वसाहत परिसरातील शेतात विक्रीसाठी आणून ठेवलेला अडीच किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण ने जप्त केला.

यामध्ये, चेतन विजय पवार (वय 24 रा.गडमुडशिंगी )आणि सुलेमान शेख(वय 23, रा.बेघरवाडी, विशाळगड) या दोघांसह गांजाचा पुरवठा करणारा रमेश शिंदे (वय 50 रा विक्रमनगर )यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. यातील पवार आणि शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर तिसरा संशयित रमेश शिंदे यांचा शोध सुरू आहे.

🤙 9921334545