“विरोधक मला एकटे पाडत नसून, कागलच्या विकासाला एकटे पाडत आहेत” : समरजीत घाटगे

 कोल्हापूर:  भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.“विरोधक मला एकटे पाडत नसून, कागलच्या विकासाला ते एकटे पाडत आहेत. ही निवडणूक कोणाला पराभूत करण्याची नाही, तर कागलच्या विकासासाठी परिवर्तन घडवण्यासाठी आहे.” समरजीत घाटगे यांनी असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घाटगे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी समरजीत घाटगे म्हणाले की, “मी फार पुढे गेलो आहे. आता मागे फिरणे अशक्य आहे. “अशा शब्दात त्यांनी भूमिका मांडली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी आमदार अमल महाडिक ,प्रदेश कार्यकारणी सचिव महेश जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम हे उपस्थित होते.

🤙 9921334545