डीजेच्या आवाजामुळे महिला झाली कर्णबधिर !

 कोल्हापूर : गणपतीच्या मिरवणुकीत डीजेच्या ठेक्यावर तरुणांना नाचताना आपण पाहतोच . हे दृश्य नेहमीचच आहे. परंतु डीजेतून बाहेर येणाऱ्या लहरी दोन्ही कानावर आदळून कर्णबधिरत्व येत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत. कोरेगाव तालुक्यातील एका गावामध्ये आपल्या मुलगी च्या लग्नात वाजणाऱ्या डीजेमुळे तिच्या आईला कर्णबधिरत्व आले आहे.

तर सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात नागपंचमीच्या मिरवणुकीत तब्बल आठ युवकांनाही कर्णबधिरत्व आल्याची माहिती समोर येत आहे. या सगळ्यांवर कराड येथे उपचार सुरू आहेत.
प्रत्येकाच्या कानाची क्षमता भिन्न असते डीजेच्या ध्वनिलहरी कानांच्या नसावर परिणाम करत असतात . त्यामुळे पडदा व्यवस्थित असला, तरीही अजिबात ऐकू न येणे हा त्रास रुग्णांना जाणवत आहे.

🤙 9921334545