लाच घेताना ‘अन्नसुरक्षा अधिकारी’ पोलिसांच्या ताब्यात !

कोल्हापूर : अन्न औषध प्रशासन विभागातील अन्नसुरक्षा अधिकारी विकास सोनवणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले.
वेफर्स उत्पादकावरील कारवाई-टाळण्यासाठी 45 हजार रुपयांची लाच त्यांनी घेतली. सोनवणे हे तक्रारदार यांच्या वेफर्स आणि नमकीन या खाद्यपदार्थाचे सॅम्पल्स घेऊन गेले. सॅम्पलमध्ये कोणतीही कारवाई न करण्यासाठी तसेच फर्माची लायसन रद्द न करण्यासाठी तक्रारदाराकडे 45 हजार रुपयाची लाचेची मागणी केली .

ही लाच स्वीकारताना त्यांना पोलिसांनी रंगेहात पकडलं .आरोपी विरोधात जुना राजवाडा पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.