मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी घेतले महालक्ष्मीचे दर्शन;

कोल्हापूर: राज्याचे मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांच्या पत्नी .लता एकनाथ शिंदे यांनी आज करवीरनिवासिनी आई अंबाबाई चे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपस्थित होते.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सचिव शिवराज नायकवडी यांनी त्यांचे स्वागत केले. शिवसेना महिला आघाडी महानगरप्रमुख मंगलताई साळोखे, लाडकी बहीण योजना शहर अध्यक्ष व शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, समन्वयक श्रीमती पूजा भोर, गौरी माळदकर, सुनंदा भोपळे, .पूजा शिंदे आदी महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.

🤙 8080365706