नाशिक = सदगुरू गंगागिरी महाराज संस्थान तर्फे सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही’ असे सूचक विधान केले.

महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे,असेही ते यावेळी म्हणाले .हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याचे कौतुक केले.
