रत्नागिरी: रत्नागिरीतील एका तरुणाने रेल्वे पुलावरून उडी मारून रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल करून मी ट्रेन खाली आत्महत्या करीत असल्याचे सांगितले सुरेंद्र राजेंद्र कीर (रा.मुरुगवाडा- पेठकिल्ला रोड ,रत्नागिरी)असे तरुणाचे नाव आहे
सुरेंद्र ला दारूचे व्यसन होते, तो गुरुवारी दुपारी शहराजवळ कुवारबाव येथील टीआरपी जवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर गेला होता. तेथून त्याने बहिणीला मोबाईलवर व्हिडिओ कॉल केला आणि मी ट्रेन खाली आत्महत्या करत आहे असे सांगून फोन कट केला .त्यानंतर त्याने पुलावरून रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली. मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत असल्याने पोलिसांना मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले. त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.