पुणे :मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे. राज्यातील 15000 हून अधिक लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

गरजू महिलांच्या घर संसाराला हातभार लावणारी ही योजना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून केला जात आहे, तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप विरोधकांच्या महाविकास आघाडीकडून केला जात आहे.
कार्यक्रमाच्या वेळी लाभार्थीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बैठक व्यवस्था पार्किंग महिलांना कार्यक्रम स्थळी आणण्याची व्यवस्था, त्यांची आरोग्य तपासणी ,भोजन ,पिण्याची पाणी ,स्वच्छतागृह आदीव्यवस्था चोख होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे
या कार्यक्रमास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील ,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम आदिसह खासदार, आमदार ,प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
