कोल्हापूर प्रतिनिधी :युवराज राऊत
गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालं यात सुमारे वीस कोटीच नुकसान झालं या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .भारतीय जनता पार्टीचे समरजितसिंह घाटगे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहून रोकडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कलाकारांसह विविध क्षेत्रातील नागरिक या ठिकाणी पाहणी करण्यासाठी येत होते. दरम्यान या ठिकाणी पुण्यासह कोल्हापुरातील लावणी कलाकार आणि लावणी संयोजकांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी कलाकार राशिद पुणेकर म्हणाले की,कलाक्षेत्रातील ही अत्यंत दुःखद घटना आहे या आगीमुळे कोल्हापूरची सांस्कृतिक हानी झाली आहे .प्रशासनाला विनंती आहे की प्रशासनाने लवकरात लवकर नाट्यगृह सुसज्ज करावे तसेच नाट्यगृहात लावणीला बंदी घातली आहे ,एकिकडे प्रशासन म्हणतं की लावणी ही महाराष्ट्राची शान आहे ही संस्कृती आपण जपली पाहिजे आणि याच कलेला कोल्हापुरात सादर करायला नाट्यगृहाची व्यवस्था नाही ,ही खेदाची गोष्ट आहे .त्यामुळे लावणी साठी नाट्यगृह सुरू करण्यात यावं अशी विनंती केली.
