‘या’ मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर;

मुंबई: मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. सर्व भाषांमधील सर्वोत्कृष्ट सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येत. राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार दिले जातात. यंदा मराठीमध्ये ‘वाळवी’या चित्रपटाने बाजी मारली आहे.

                                                   

वाळवी बरोबरच आणखीन दोन मराठी सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत .’मर्मस ऑफ द जंगल’ या मराठी सिनेमाला बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्मचा अवोर्ड मिळाला आहे तर ‘वारसा’या माहितीपटालाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ 13 जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे, अनिता दाते ,सुबोध भावे अशी या सिनेमाची स्टार कास्ट होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ही चांगली कमाई केली होती.