कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा दूध संघाने कोल्हापुरात खासगी पशुवैद्यकीय व डेरी टेक्नॉलॉजी महाविद्यालय उभे करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातील पहिलेच खासगी महाविद्यालय होणार आहे . या महाविद्यालयाचा फायदा कोल्हापुरातील शेतकऱ्याच्या मुलांना होणार आहे.

सध्या महाराष्ट्रात शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय पाच ठिकाणी तर देशात खासगी व शासकीय महाविद्यालयांची संख्या केवळ 56 आहे यापूर्वी महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयाना परवानगी दिली जात नसल्याने ही संख्या मर्यादित राहिली मात्र आता शासनाने परवानगी दिल्याने कोल्हापूर गोकुळने प्रस्ताव तयार केला असून सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन शासनाकडे पाठवला जाणार आहे.
