कोल्हापूर -दिल्ली विमानसेवा होणार सुरू : खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

कोल्हापूर : प्रदिर्घ काळापासून कोल्हापूर- दिल्ली, कोल्हापूर -नागपूर, कोल्हापूर- गोवा या मार्गावरील विमान सेवा सुरू करण्याची मागणी कोल्हपुरकरांकडून होत होती. कोल्हापूरकरांच्या या मागणीची पूर्तता अंतिम टप्प्यात आली आहे. कोल्हापूर ते दिल्ली या मार्गावर विमानसेवा सत्तावीस ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे .

 

याशिवाय, कोल्हापूर ते नागपूर आणि कोल्हापूर ते गोवा या मार्गावरील ही विमान सेवा लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. कोल्हापूर- दिल्ली -कोल्हापूर या मार्गावर हवाईसेवा सुरू होण्याचा प्रस्ताव सध्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या महासंचालकाकडे अंतिम टप्प्यात आहे.लवकरच त्याला मान्यता मिळेल आणि कोल्हापूर-दिल्ली थेट विमान सेवा सुरू होईल. असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

🤙 8080365706