कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या वतीने “हर घर तिरंगा” रॅली काढण्यात आली. महाविद्यालय – सीपीआर परिसर – छञपती शाहू महाराज पुतळा दसरा चौकमार्गे- महाविद्यालय अशी तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय व वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.
रॅली मार्गातील सर्व ठिकाणी उपस्थित जनसमुदयास सदर मोहिमे अंतर्गत आपापल्या घरावर तिरंगा फडकवून हा राष्ट्रीय सण साजरा करावा व त्याची सेल्फी काढून हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करण्याबद्दलचे एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ डी एल काशिद -पाटील यांनी आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण यांनी भारतीय प्रतिज्ञेचे विद्यार्थ्यासमोर वाचन करून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या जवानांच्या कार्याप्रति व त्यागाप्रति कृतज्ञता व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशप्रेमाचे व देशभक्तीचे विचार जागृत केले. आजच्या युगात विद्यार्थ्यांनी क्षणोक्षणी स्वातंत्र्यप्राप्तीच्या लढ्यामध्ये जीवन बलिदान देणाऱ्या देशभक्तांचा आदर ठेवणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले.
प्रा. डॉ. एस व्ही शिखरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची भावना, समता, स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या देशभक्तांच्या बलिदानाच्या आठवणी जागृत केल्या.
एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ प्रशांत पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ आर डी मांडणीकर, एनएसएस सह समन्वयक डॉ एस डी जाधव, डॉ एन डी काशिद -पाटील, प्रबंधक रविंद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले आणि महाविद्यालयाचे सर्व एनएसएस, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थी, प्राध्यापक वृंद,प्रशासकीय कर्मचारी या अभियानामध्ये उत्सफूर्तपणे सहभागी झाले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे या उपक्रमास प्रोत्साहन मिळाले.