नाशिक:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅली सुरू करण्यात आली होती. नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला.
नाशिक शहरात पोलिसांनी सुमारे दीड हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तात तैनात केला होता. पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कुठेही अडचण आली नाही. तसेच सीबीएस चौकात ही सभा सुरळीत पार पडली. सायंकाळी पाच नंतर पोलिसांचा बंदोबस्त कमी करण्यात आला.