कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील
लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने सध्या सण उत्सव व विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या आवाजात डॉल्बी साउंड लावून हुल्लडबाजी करण्याचे प्रकार वाढत आहेत.

डॉल्बी साउंड च्या होणाऱ्या प्रचंड मोठ्या आवाजाने नागरिकांचे स्वास्थ्य बिघडते व त्याचा आजारी लोकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका संभवतो आहे तरी या संदर्भात ठोस निर्णय घेऊन डॉल्बीच्या प्रचंड मोठ्या कर्ण कर्कश्य आवाजावर पोलीस विभागामार्फत बंदी घालण्यात यावी व समाजाचे स्वास्थ्य अबाधित ठेवावे अशी मागणी लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक तानाजी सावंत यांच्याकडे करण्यात आली. यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल चव्हाण ,शशिकांत जाधव, बाळकृष्ण गवळी ,संग्राम पाटील आदी उपस्थित होते
