मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा ! म्हणाले…..

    मुंबई :मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळेस उपोषण, आंदोलन केलं पण सरकाने अद्याप यावर कोणताच निर्णय घेतला नाहीय ,अशातच ओबीसी नेत्यांनी मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीचा विरोध केला आहे,त्यामुळे पाटील व ओबीसी नेते यांच्यात आरोप प्रत्यारोप असे राजकारण सुरु आहे ..  

       

     मनोज जरांगे म्हणाले ,आरक्षण देण्याचं केंद्र सत्ता आहे ,आणि जे सत्तेत आहेत ते जर आरक्षण देत नसतील तर सत्तेत गेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही गेल्या काही दिवसांपासून राजकारण ढवळून निघालेलं आहे. सरकारने सत्तेचा गैरवापर केला. अशाप्रकारची सत्ता याआधी मी कधी पाहिली नाही . मराठा समाजाला बोलल मी सहन करणार नाही ,समाजाच्या प्रश्नासाठी मी ताकदीने उभा आहे ,म्हणूनच माझ्या विरोधात सर्व एकत्र आले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अशा पाच ते सहा टोळ्या उभ्या केल्या आहेत. पण त्याचा काहीही फायदा होणार नाही”, असंही मनोज जरांगे म्हणाले.

🤙 9921334545