गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळाले . महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर कमी आहे .दरम्यान, आज राज्यात हवामानाची स्थिती नेमकी काय असेल? .आज राज्यात पाऊस पडणार का? याबाबतची सविस्तर माहिती हवामान विभागानं दिली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे किनारपट्टी ,घाटमाथा , विदर्भात तुरळ ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या खाडीत तयार झालेले आणि अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झारखंड, मध्य प्रदेश वरून राजस्थान कडे पुढे गेले आहेत .विदर्भ ,उत्तर मराठवाडा ,उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुढील तीन-चार दिवस राहणार आहे.