कोल्हापूर प्रतिनिधी संग्राम पाटील:
*पोलिसांच्या वतीने प्रामाणिक महिलेचा सत्कार*
करवीर पोलीस ठाणे हद्दीतील कोगे तालुका करवीर गावी राहणारे किरण शिवाजी सातपुते यांची *दीड तोळ्याची सोन्याची चेन* दिनांक 01.08.2024 रोजी हरवलेली होती..
याबाबत त्यांनी पोलिसांशी संपर्क केला पोलिसांच्या मार्गदर्शनानुसार सोशल मीडियातून त्यांनी सदरची वस्तू हरवलेली आहे ती परत मिळावी असे आवाहन केले होते.
त्यानुसार *कोगे गावात राहणाऱ्या सौ. अनिता रमेश सातपुते* यांनी त्यांना *सापडलेली सदरची दीड तोळ्याची सोन्याची चेन* प्रामाणिकपणे त्यांनी परत केली.. या *त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल* करवीर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे यांनी *पुष्पगुच्छ देऊन सत्कार* केला, व त्यांच्या *प्रामाणिकपणाचे कौतुक* केले.. किरण शिवाजी सातपुते यांनी देखील त्यांचे व करवीर पोलीसांचे आभार मानले.
यावेळी करवीर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक, जालिंदर जाधव, आकाशदीप भोसले, बीट अंमलदार पोलीस हवालदार विजय गुरव, सुभाष कांबळे व पोलीस कॉन्स्टेबल अविनाश कांबळे गावातील आनंदा बाळू सातपुते, रमेश तुकाराम सातपुते, सुधीर युवराज सातपुते, शहाजी परीट उपस्थित होते.