एक्स्प्रेस गाड्यांना हातकणंगले, जयसिंगपूरमध्ये थांबा द्या खा.धैर्यशील माने यांची लोकसभेत मागणी

कोल्हापूर प्रतिनीधी :-
हातकणंगले ते इचलकरंजी रेल्वे मार्ग मंजूर झाला आहे, या मार्गाच्या कामासाठी तातडीने निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी करून हातकणंगले रेल्वे स्थानकाजवळ इचलकरंजी शहर आहे, ज्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात, या कापड व्यवसायासाठी हातकणंगले रेल्वे स्थानकाजवळ गोदामे बांधली जावीत अशी मागणी यावेळी खासदार माने यांनी केली


कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी आवश्यक कार्यवाही करा.
कोल्हापूर ते बंगळुरू राणी चन्नम्मा एक्स्प्रेस सांगली येथून सुरू करण्यात आली असून, पूर्वी कोल्हापूर स्थानकावरून सुटणारी गाडी पूर्वीप्रमाणेच कोल्हापूर स्थानकावरून सुरू करण्यात यावी.कोल्हापूरहून मुंबईला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस सध्या पुण्यापर्यंतच जाते. त्यामुळे कोल्हापूरहून जाणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर मोठा भार पडतो, त्यामुळे कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत सुरू करण्यात यावी. कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत गाडीला मंजुरी मिळाली असून कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस त्वरित सुरू करावी. यापूर्वी कोल्हापुरातून एकूण 14 रेल्वे गाड्या धावत होत्या, मात्र कोविड-19 मुळे कोयना आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या दोनच गाड्या धावू लागल्या आहेत. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणारी महालक्ष्मी आणि सह्याद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर सोलापूर, कोल्हापूर नागपूर, साप्ताहिक दोनदा कोल्हापूर- पंढरपूर, कोल्हापूर तिरुपती, कोल्हापूर अहमदाबाद, कोल्हापूर मिरज,कोल्हापूर-सांगली पॅसेंजर ट्रेन बंद असून ती पुन्हा सुरू करावी. मिरज स्थानकावरून कोल्हापूरहून बेंगळुरूकडे जाणारी राणी चेन्नमा एक्स्प्रेस सोडण्याचा मध्य रेल्वेने घेतलेला निर्णय रद्द करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला गती मिळू शकत नाही. असेही खासदार माने यांनी नमूद केले
कोल्हापूरहून सुटणार्‍या आणि कोल्हापूरकडे येणार्‍या सर्वच एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना हातकणंगले आणि जयसिंगपूरमध्ये थांबा द्यावा, अशी आग्रही मागणी खा.धैर्यशील माने यांनी बुधवारी लोकसभेत केली. याबाबत रेल्वे मंत्र्यांनी या संदर्भात तातडीने निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले.
कोल्हापूर, मिरज मार्गावर वळीवडे, रुकडी, हातकणंगले, जयसिंगपूर येथे थांबे आहेत. यातील बहुतांशी एक्स्प्रेस गाड्या हातकणंगले रेल्वे स्थानकावर थांबतात. परंतु जयसिंगपूर व्यापार नगरी आहे. अनेक उद्योजक हातकणंगलेमध्ये वेळेत पोहचता नाही आले तर त्यांना मिरज येथे जावे लागते. त्यामुळे त्यांची मोठी अडचण होते. यासाठी एक्स्प्रेस गाड्यांनाही जयसिंगपूर स्थानकावर थांबा द्यावा, तसेच कोयना एक्स्प्रेस वळीवडे, रुकडी, ताकारी तसेच महालक्ष्मी एक्स्प्रेस यांनाही त्या ठिकाणी थांबा द्यावा, दादर एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेसला ताकारी स्टेशनवर थांबा द्यावा. निजामुद्दीन एक्स्प्रेस, धनबाद एक्स्प्रेस आणि नागपूर एक्स्प्रेस या गाड्या हातकणंगले, जयसिंगपूर येथे थांबविण्यात याव्यात, अहमदाबाद आणि हरिप्रिया एक्स्प्रेसला जयसिंगपूर येथे थांबा द्यावा, कोरोनाच्या काळात कोल्हापूरहुन गोंदीयाला जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस पुर्ववत 3.15 वा.कोल्हापूरहुन सोडावी, अशी मागणी खा.माने यांनी केली आहे.