अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचे दुसरे प्री-वेडिंग सध्या क्रूझवर जोरदार सुरू आहे. इटली ते फ्रान्स असा प्रवास करत सुरू असलेल्या या दुसऱ्या प्री-वेडिंगचा आज तिसरा दिवस असून जगप्रसिद्ध अमेरिकन गायिका कॅटी पेरी परफॉर्म करणार असल्याचे समोर आले आहे.
अमेरिकन गायिका कॅटी पेरी अनंत व राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये आज परफॉर्म करणार आहे. फ्रान्समधील ५०.९ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास ४२४ कोटींच्या व्हिलामध्ये कॅटी पेरी तिच्या गाण्यांनी धुमाकूळ घालणार आहे. कॅटी पेरीला ‘ले मास्करेड’मध्ये परफॉर्मन्ससाठी अंबानी कुटुंबाकडून लाखो डॉलरचा चेक मिळाला आहे. कॅटी खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी १२ ते १६ कोटी मानधन घेते. त्यानुसार तिला अंबानींकडून मानधन मिळाल्याचे म्हटले जात आहे.
कान्समध्ये एका मोठ्या कार्यक्रमासाठी ८०० पाहुणे क्रूझमधून उतरणार आहेत. या कार्यक्रमाच्या थीमचे नाव ‘ला वीटा इ अन वियाजिओ’ असे आहे. ५ तासांच्या कार्यक्रमामध्ये कॅटी पेरी परफॉर्म करणार असून त्यानंतर सर्व पाहुणे पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. अनंत-राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग ज्या क्रूझवर होते आहे, त्याची किंमत जवळपास ७ हजार ५०० कोटी रुपये आहे. कूझवर स्पा, जिम, स्विमिंग पूल अशा अनेक सुविधा आहेत; ज्याची किंमत ६० लाख आहे.
अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगच्या पहिल्या २९ मे ला लोकप्रिय अमेरिकन बँड, बॅकस्ट्रीट बॉइजने कूझवर परफॉर्म केला. यामध्ये बँडमधील निक कार्टर, होवी डोरो, ब्रायन लिट्रेल, एजे मॅकलीन आणि केविन रिचर्डसन पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दिसत असून त्यांचे सुपरहिट गाणे ‘आय वांट इट दैट वे’वर परफॉर्म करताना पाहायला मिळत आहेत. अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगमध्ये रिहाना, दिलजीत दोसांझ, अरिजीत सिंह, श्रेया घोषाल आणि इतर गायकांनी परफॉर्मन्स केला होता. या गायकांच्या तालावर सेलिब्रिटी जबरदस्त थिरकले होते.