पंचगंगा नदी प्रदूषित होण्यापासून रोका : करवीर तालुका शिवसेना उबाठा पक्ष

पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या गांधीनगर, उंचगाव, वळीवडे, गडमुडशिंगी व चिंचवाड या गावातील ओढे, नाले, गटारी प्लॅस्टिक कचऱ्यासह इतर कचऱ्याने तुडुंब भरलेल्या आहेत. त्या साफ करून पंचगंगा प्रदूषण होण्यापासून थांबविण्यासाठीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस यांना देण्यात आले.

गेल्या ८-१० दिवसापूर्वी विभागीय आयुक्त, पुणे यांनी कोल्हापूरमध्ये बैठक घेतली. ग्रामीण भागातील अवैद्य होर्डिंगसह पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व गट विकास अधिकारी यांच्या या संयुक्त बैठकीत सूचना करण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागातील ग्रामविकास अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचे अवैद्य होर्डिंग किंवा पंचगंगा नदी प्रदूषित करणारे घटक ओढे, नाले, गटारी साफ करण्याबाबत कोणतीही कारवाई ग्रामपंचायत पातळीवरती केली नाही. विभागीय आयुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले.

प्लास्टिकने संपूर्ण ओढे, नाले, गटारी तुडुंब भरले असून पावसाळ्यापूर्वी साफ करण्याचे आदेश द्यावे, अन्यथा बेकायदेशीर प्लास्टिक विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच पंचगंगा नदी प्रदूषित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. यांच्याकडे 28 मे ला होर्डिंग वाल्यांनी मुदत मागितली होती. पण आता त्यांची मुदत संपली आहे. बेकायदेशीर विनापरवाना होर्डिंग चे स्ट्रक्चर ऑडिट केले नसेल तर त्यांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.

यावेळी उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विभाग प्रमुख बाबुराव पाटील आदी उपस्थित होते.