आ. पी. एन. पाटलांच्या लाडक्या ‘ब्रुनो’ने देखील जीव सोडला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचे 23 मे रोजी निधन झाले. 19 मे रोजी राहत्य घरी बाथरुममध्ये पाय घसरून पडल्यानंतर त्यांच्याच मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाटील यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांसह जिल्हा काँग्रेसला धक्का बसला असतानाच आता त्यांच्या लाडक्या श्वानाने देखील आपला जीव सोडला आहे. पी. एन. पाटील यांच्या घरी गेल्या 9 वर्षांपासून ‘ब्रुनो’ घरचा सोबतीच होता. मात्र, पी. एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ब्रुनोने काहीच खाल्लं नव्हतं. ब्रुनोने सुद्धा काल 28 मे रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मुक्या प्राण्यांमधील भावना पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.