अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा परदेशात

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या पहिल्या प्री-वेडिंगनंतर आता दुसऱ्या प्री-वेडिंगची जोरदार चर्चा रंगली आहे. अनंत-राधिकाचा हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा चार दिवस रंगणार आहे. २९ मेला सुरू होऊन १ जूनपर्यंत असणार आहे. पण हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा परदेशात मोठ्या थाटामाटात चक्क क्रूझवर पार पडणार आहे.

अनंत-राधिकाचा पहिला प्री-वेडिंग सोहळा गुजरात येथील जामगरमध्ये झाला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. बॉलीवूड कलाकारांची तर मांदियाळीचं पाहायला मिळाली. आताही दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये बॉलीवूड कलाकार सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे इटली ते फ्रान्स असा प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग पार पडणार आहे.

दरम्यान, अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर-आलिया भट्ट असे बरेच कलाकार काल इटलीला रवाना झाले. शिवाय अंबानी व मर्चंट कुटुंबातील सदस्य देखील रवाना झाले. अनंत-राधिकाचा हा बहुचर्चित दुसरा प्री-वेडिंग सोहळा सुरू होण्यासासाठी अवघे काही तास बाकी आहेत.