एनडीएने शेवटच्या टप्प्याआधीच बहुमताचा टप्पा गाठला आहे. असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केली आहे. विरोधी पक्ष किती सक्षम असावा हा निर्णय आता जनतेने घ्यावा असे शाह म्हणाले. अखेरचा टप्पा पार होण्याआधीच एनडीएने 300 जागांचा आकडा गाठल्याचे ते म्हणाले. राज्यात उद्धव ठाकरेंना पुन्हा सोबत घेणार का या प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिलं. राज्यात आमची शिवसेनेशी युती आहे, आणि युतीत सर्वकाही आलबेल आहे असं ते म्हणाले. तसेच त्यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे.
घड्याळाचे काटे उलटे फिरवून 2019 ची परिस्थिती पु्न्हा आणणे शक्य असते तर तुम्ही महाराष्ट्रात वेगळ्याप्रकारे गोष्टी केल्या असत्या का, असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला. त्यावेळी अमित शाह यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. यावर अमित शाह म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला बहुमत मिळाले होते. शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना आमच्याकडून तोडले. उद्धव ठाकरे आमचे मित्र होते, आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. ज्याने हे सगळे सुरु केले त्यानेच हे संपवले पाहिजे.
अमित शाह म्हणाले, आम्ही अखेरचा टप्पा गाठण्याआधीच आम्ही बहुमताचा टप्पा गाठला आहे. आम्ही शेवटच्या टप्प्या अगोदर 300 ते 350 जागांच्या आसपास होतो. अजून यामध्ये शेवटच्या टप्प्यातील जागा नाहीत. अखेरचा टप्पा पार होण्याअगोदरच भाजप सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत होते. आम्ही 400 पार जाणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विरोधकांच्या वक्तव्यावर अमित शाह म्हणाले, नरेंद्र मोदी आपली टर्म पूर्ण करतील. तसेच पुढेही मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील. याबाबत भाजपात कोणताही संभ्रम नाही. विरोधक मात्र संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढच नाही तर जून 2029 मध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदीच नेतृत्व करतील.