भोगावती कारखान्याला मदत करावी : आमदार विनय कोरे

कोल्हापूर प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा काँग्रेस भवनात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. पी. एन. पाटील यांच्या भोगावती साखर कारखान्याला सर्वांनी मदत करण्याची आवश्यकता आहे. आपण सर्वानी मिळून भोगावती कारखान्याला मदत करू आणि भोगावती कारखाना पुढे नेऊ असे यावेळी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे बोलत होते.

आमदार पी. एन. पाटील यांचे उचित स्मारक उभारण्यात येईल, असे काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. तर, पी. एन. पाटील यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याची संकल्पना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली.

श्रीमंत शाहू महाराज, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगांवकर,  माजी आमदार संजयबाबा घाटगे, के पी पाटील, राजीव आवळे, श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड, व्ही बी पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, सुनिल मोदी, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, ए वाय पाटील, आपचे संदीप देसाई , कॉम्रेड दिलीप पवार, चेतन नरके, उदय नारकर, आर के पोवार, सुर्यकांत पाटील बुध्दिहाळकर, बाबासो पाटील आसुर्लेकर, सरलाताई पाटील , सुप्रिया साळोखे, मनसेचे प्रसाद पाटील, दगडू भास्कर, राहूल खंजीरे, गोकुळचे विश्वास पाटील, रामराजे कुपेकर, भैया माने, कॉम्रेड चंद्रकांत यादव, अतुल दिघे, वसंतराव मुळीक, सतीशचंद्र कांबळे, शेकापचे केरबा पाटील, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, कॉग्रेस, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना( ठाकरे गट), मनसे,आप कम्युनिस्ट पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, शेकाप, जिल्हा बॅकेचे संचालक, गोकुळ संचालक, बाजार समितीचे संचालक सर्व तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.