कागल,प्रतिनिधी : केंद्रीय हवाई मंत्री ज्योतीरादित्य सिंधीया यांची ग्वालियर येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी सांत्वनपर भेट घेतली. मंत्री सिंधीया यांच्या मातोश्री राजमाता माधवीराजे सिंधीया यांचे नुकतेच निधन झाले.त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबीयांची घाटगे यांनी भेट घेतली. राजमाता सिंधिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
यावेळी कोल्हापूर भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक- निंबाळकर उपस्थित होते. कागलचे घाटगे घराणे व ग्वाल्हेरचे सिंधीया घराणे यांचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. स्व.माधवराव सिंधीया व शाहू ग्रुपचे संस्थापक स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांचीही दृढ मैत्री होती. या आठवणींनी भेटी दरम्यान उभयंतानी उजाळा दिला.