शाहरुख खानला त्याच्या संघाचा जयजयकार करणे पडले महागात

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी  बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान हा अभिनेता अहमदाबादमध्ये आला होता. या सामन्यादरम्यान शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली आणि उष्माघातामुळे त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. शाहरूख खानचे वय सध्या ५८ वर्षे आहे. तो आपल्या आरोग्याची योग्य रीतीने काळजीदेखील घेतो. पण तरीही त्याला ऊषामाघाताचा त्रास झाला. शाहरुख खानला ४५ अंश तापमान असलेल्या उष्णतेमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या त्याच्या संघाचा जयजयकार करणे चांगलेच महागात पडले.

“तुम्ही कितीही तंदुरुस्त असलात तरी बराच काळ उच्च तापमानाच्या संपर्कात राहिल्यास तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमचे वय ५० पेक्षा जास्त असल्यास आणि उच्च रक्तदाब व मधुमेह यांसारखे आजार असल्यास निर्जलीकरण आणि अतिउष्णतेचा तुमच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.”कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामना पाहण्यासाठी  बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान हा अभिनेता अहमदाबादमध्ये आला होता. हा सामना चालू असताना शाहरुख खानला ऊषामाघाताचा त्रास होऊ होऊन अस्वस्थता वाटू लागली.  त्वरितच त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन ऊषामाघाताचा त्रास झाल्याचे सांगितले. आता त्याला होणारा उष्माघाताचा त्रास थोडा कमी झाला असल्याचे सांगण्यात आले.