आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला मराठा समाज मैदानात उतरेल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी त्यांची तब्येत बिघडल्यानं ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी आज रुग्णालयातूनच पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे. अजून राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज मैदानात उतरेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

‘आता राजकारणात उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज मैदानात उतरेल. आता नाव घेतले नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल. विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावे लागेल असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, पाच टप्प्यात निवडणूक होत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या. नाशिकमध्येही मी कुणाला पाठिंबा दिला नाही. अफवा पसरवल्या जात आहेत,’ असंही यावेळी जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.
सर्वांना विनंती आहे की भावनिक होऊ नका, आपल्या लेकरांच्या बाजूनं उभे राहा, आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी रहा. आपल्या लेकरांना जो न्याय देईल त्यालाच मतदान करा. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाय पडतील आणि पुन्हा विसरून जातील. मतामधून आपली ताकद दाखवा असं आवाहानही यावेळी जरांगे पाटील यांनी यावेळी केलं.

नारायण गडची सभा रद्द झाली कारण तिथे तयारी नव्हती. सर्वांचे हाल झाले असते. पुन्हा यापेक्षा ताकदीने मोठी सभा करू. तिथे अडचणी आहे त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते, असंही जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं.

🤙 8080365706