राज ठाकरेंची मागणी मोदींनी केली लगेच पूर्ण

भारतीय जनता पार्टीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा जिंकल्या तर ते देशाचं संविधान बदलतील, लोकशाही संपवतील असा दावा विरोधक करत आहेत. विरोधकांचे सातत्याने होणारे हे दावे पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक मागणी केली. राज ठाकरेंची ही मागणी मोदींनी लगेच पूर्ण केली.

महायुतीच्या मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा उमेदवारांच्या प्रचारासाठी महायुतीने पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर संयुक्त सभा घेतली. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केलं.

राज ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे माझी एक मागणी आहे. ते गेल्या काही सभांमधून ते सातत्याने सांगतायत, मात्र आज जरा त्यांनी खडसावून सांगायला हवं. त्यांनी विरोधकांना सांगावं की या भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केलं आहे, त्याला कुठेही धक्का लागणार नाही. तुम्ही  कधी आपल्या संविधानाला धक्का लावणार नव्हता, मात्र तुमचे विरोधक जो प्रचार करत आहेत. ते पाहता त्यांना उतर देऊन तुम्ही त्यांची तोंडं कायमची बंद करायला हवीत. त्यांची तोंडं परत कधी उघडली जाऊ नयेत यासाठी तुम्ही त्यांना खडसावून सांगा की आपल्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही.”

🤙 8080365706