ओटीटीवर प्रदर्शित होणार मराठी सिनेमा

हिंदी व इंग्रजी सिनेमा, वेब सीरिजप्रमाणेच आता मराठीतही थिएटरमध्ये न प्रदर्शित करता थेट ओटीटीवर रिलीज करण्याचे प्रयोग निर्माते करत आहेत. लवकरच ‘रंगीत’ नावाचा मराठी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत.

एखादी व्यक्ती प्रेमात पडल्यानंतर त्याला आयुष्य हे रंगीत वाटू लागते. पण जेव्हा प्रेमात विरह येतो तेव्हा ते रंगहीन होते. या विरहामागे जर रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ हा मराठी चित्रपट १७ मे २०२४ रोजी थेट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना आजवर न मिळालेल्या एका थरारक चित्रपटाचा मनमुराद आस्वाद घेता येणार आहे.