लोकसभा निवडणुकीचे एकूण 7 टप्प्यात मतदान होणार असून, 4 टप्पातील मतदान पार पडले आहे. २० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर देशात 4 जून रोजी निकाल जाहीर होतील. तर आता राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप आणखीच तीव्रपणे केले जात आहे.
अशातच वंचित बहूजण आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले,’जो धर्मवादी आहे, जो भाजपासोबत पुन्हा जाणार नाही असं लिहून देणारा नाही अशा उद्धव ठाकरेंकडे कुठली वॉशिंग मशिन आहे, ज्यातून ते धर्मवादीतून सेक्युलरवादी झाले. ही कुठली वॉशिंग मशिन आहे ती आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सर्व धर्मवाद्यांना वॉशिंगमध्ये टाकून सेक्युलरवादी बनवू असा खोचक टोला आंबेडकरांनी लगावला.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंचं फसवण्याचं राजकारण चाललं आहे. यातून जनतेनं वाचलं पाहिजे. मुसलमान उमेदवार दिला तर भाजपाला फायदा होईल असं उबाठा, काँग्रेसमध्ये चर्चा होती. संसदेत ५४३ जागा आहेत. राज्यात फक्त ५ ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार उभे राहिलेत. ४ मुंबईत आणि १ कल्याणमध्ये उभे राहिलेत.