पडळ ता. पन्हाळा येथे वारकरी संस्कार व संत वांड्ःमय अध्ययन केंद्र यांच्यातर्फे ‘वारकरी संस्कार शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन ऋषिकेश वासकर (आबा) यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराची सांगता शनिवार दि. 25 मे रोजी होणार आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे औचित्य साधून वारकरी संस्कार व संत वांड्ःमय अध्ययन केंद्र यांच्यातर्फे ‘वारकरी संस्कार शिबिराचे’ आयोजन करण्यात आले. हल्लीच्या वेगवान व धावपळीच्या युगात मनुष्य आपले सात्विकत्व हरवून बसला आहे. आपल्या मुलांवर आवश्यक ते योग्य संस्कार करण्याकरिता त्यांच्याकडे पुरेसा वेळ नाही तेव्हा सध्याची पिढी संस्कार हरवून बसली आहे. पालकांनी आपल्या मुलांचे जीवन उज्वल करण्यासाठी त्यांना वारकरी संस्कार शिबिरामध्ये पाठवावे असे आवाहन वारकरी संस्कार अध्ययन केंद्र या संस्थेने पालकांना केले आहे.
या शिबिरात श्रीमत भगवत गीतापाठ, विष्णुसहस्त्रनाम, मृदुंगज्ञान, गायन, हरिपाठ, नामजप, योगासन ,भजन ,संतचरित्र ज्ञानेश्वरी पारायण, भीमरूपी मारुती स्तोत्र पठण हे विशेष शिकवले जाणार आहेत. या शिबिरामध्ये 5 वी ते 9 वी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.