भेंडवडे गावात विधवा प्रथा बंद करून समाजास एक नवीन आदर्श

भेंडवडे ता-हातकलांगले येथे पतीच्या निधनानंतर विधवा झाल्यानंतर ज्या काही प्रथा आहेत त्यामुळे महिलेच्या सन्मानाने जगण्याच्या हक्कावर काही प्रमाणात गदा येत असल्याचे म्हणत कांबळे कुटुंबीय यांनी स्वतः च्या घरा पासून सुरुवात करत भेंडवडे गावात एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

भेंडवडे गावचे प्रतिष्ठित नागरिक व माजी सैनिक कालकथित मारूती बंडू कांबळे (लान्स नायक) ह्यांचे सोमवार दि.०६-०५-२०२४ ह्या रोजी दुःखद निधन झाले. पुण्यानुमोदन दि.०९-०५-२०२४ रोजी कऱण्यात आले.या प्रसंगी कांबळे कुटुंबीयांनी व महिला ह्यांनी विधवा प्रथा परंपरा बंद करून पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगता यावं म्हणून जुन्या रूढी ह्यांना फाटा देत. विधवा प्रथा परंपरा बंद करून समाजास एक आदर्श स्थापन केला आहे. कालकथित मारूती बंडू कांबळे हे सामाजिक कार्यकर्ते आयु. प्रशांत मारुती कांबळे यांचे वडील होते त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,सून, नातवंडे, मुली असा मोठा परिवार आहे.

 

🤙 9921334545