राज ठाकरेंची रविवारी आनंद आश्रमाला भेट

राज ठाकरे रविवारी धर्मवीर आनंद  दिघेंच्या  आनंद  आश्रमाला भेट देणार आहे. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच आनंद दिघेंच्या आश्रमात जाणार आहे. रविवार कळव्यात राज ठाकरेंची नरेश म्हस्केंच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी आनंद आश्रमात जाणार आहेत.  

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी कळवा इथे राज ठाकरे सभा घेणार आहे. त्याआधी ठाण्यातील शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार आणि पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या जल्लोषात राज ठाकरे यांचे ठाण्यात स्वागत केले जाणार आहे.  दिघे यांच्या आश्रमात देखील जोरदार स्वागताची तयारी करण्यात येत आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या बंडांनंतर फूट पडली.त्यानंतर उद्धव ठाकरे टेंभी नाका परिसरात गेले मात्र ते आनंद आश्रमाकडे गेले नाहीत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर  आनंद आश्रमात कोण जाणार? यावरून दोन्ही गटांमध्ये धुसफूस सुरू होती. त्यानंतर काही दिवस दोन्ही गट आनंद आश्रम या ठिकाणी जात होते. मात्र आनंद आश्रम या जागेवर बाळासाहेबांची शिवसेना हा फलक लावण्यात आला.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका या ठिकाणी आनंद आश्रम आहे.  ठाण्यातल्या टेंभीनाका भागात असलेल्या आनंद आश्रमात दिवंगत आनंद दिघे वास्तव्यास होते. याच आश्रमातून आनंद दिघे पक्षाचा कारभार करत असत. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर शिवसैनिक या आश्रमात येऊ लागले. मात्र एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर आणि शिवसेनेत ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असे दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यामुळेच या आश्रमात येणं टाळलं असं बोललं जातं आहे.

🤙 9921334545