बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा : चंद्रकांत पाटील

बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्राथमिक टप्प्यात हे विधान केल्यामुळे बारामतीत नाराजी पसरली होती.

या विधानाचा मतदानावर काही परिणाम झाला का? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की,  सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत असताना शरद पवारांचा पराभव करण्याचा प्रश्न येतोच कुठे?  त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विधानाला काहीच अर्थ नव्हता. पण नंतर चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांना पुण्यातच राहण्याचा सल्ला आम्ही दिला. बारामतीचा प्रचार आमचे कार्यकर्ते बघून घेतील, असेही त्यांना सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी ते विधान बोलायलाच नको होते. पण ते बोलून गेले? का ते मला माहीत नाही. चंद्रकांत पाटील जे बोलले, ते चूकच होते. त्यांनी हे बोलायला नको होते. असे अजित पवार म्हणाले .