तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या आहेत. महाराष्ट्रात उद्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यामध्ये बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, लातूर, माढा, धाराशिव (उस्मानाबाद), रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, सांगली, सातारा व सोलापूर या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मंगळवार दि . 7 मे रोजी राज्यातील 11 लोकसभा मतदार संघासाठी मतदान होणार असून शिगेला पोहचलेला प्रचार आता संपला आहे . काल सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रत्येक मतदारसंघात जोरदार प्रचार सभा पडल्या. कोल्हापूरमध्ये प्रचाराच्या सांगता सभा व रॅली पार पडल्या. एकीकडे अजित पवार यांच्या नेतृत्वातील सभा व दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वातील सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थातील सभा चांगलीच गाजली. एकमेकांवर जोरदार निशाणा साधल्याने रविवार जणू पवार प्रचार संडेच वाटू लागला होता.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये ३ दिवस ठाण मांडला होता. तर माढा लोकसभा मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांची जोरदार सभा पार पडली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला. राज्यातील सर्वच ठिकाणी पवार विरुद्ध पवार असा लढा नाही तर मोदी विरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे. त्यामुळे मतदारांनी उज्वल भवितव्यासाठी महायुतीला पसंदी द्यावी, अशी साद त्यांनी घातली.

या २०२४ च्या लोकसभा निवडणूकीमध्ये प्रचारांच्या सभेमुळे आणि आरोप प्रत्यारोपाच्यांमुळे रंग आला. आता या लढतींकडे राज्याचे लक्ष लागले आहे
