नाभिक समाजाचे छत्रपती घराण्याशी शाहू महाराजांपासून जिव्हाळ्याचे संबंध : मालोजीराजे छत्रपती

कोल्हापूर  : ताराबाई पार्क येथील विश्वेश्वरय्या हॉल येथे नाभिक समाज यांच्या वतीने समाजातील गुणवंत आणि यशस्वी व्यक्तींचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे उपस्थित होते. नाभिक समाज कोल्हापूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वस्तीग्रह, हाउसिंग सोसायटी तसेच इतर उपक्रम गेले कित्येक वर्ष यशस्वीपणे चालवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतंच नाभिक समाजातील गुणवंत आणि यशस्वी समाज बांधवांचा जिल्ह्यातील तमाम नाभिक समाजाच्या वतीने गुणगौरव आणि सत्कार सोहळा पार पाडण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी नाभिक समाजाची छत्रपती घराण्याचे राजश्री शाहू महाराजांपासून अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत ,तसेच या समाजाच्या प्रत्येक अडीअडचणीला छत्रपती घराण्याकडून मोलाचे सहकार्य तसेच मदत वेळोवेळी देण्यात येत असल्याचं नमूद केले. तसेच समाजाच्या आनंदाच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार होण्याचे भाग्य देखील छत्रपती घराण्याला लाभले असल्याचे सांगितले. यावेळी नाभिक समाजाचे राजाराम शिंदे, एडवोकेट डी. एन. जाधव, नारायण पवार, सयाजी झुंजार, मोहन चव्हाण, दीपक माने, चंद्रकांत राऊत, उदय माने, अविनाश यादव, मोहन साळुंखे, दीपक खराडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विशेष सत्कारमूर्ती म्हणून एडवोकेट डी. एन. जाधव यांचा सत्कार करण्यात आला. एडवोकेट डी.एन. जाधव यांना नुकताच भारत सरकारच्या वतीने नोटरी हे पद बहाल करण्यात आला आहे. नाभिक समाजातील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेच नोटरी या पदावर आपली मोहर उठवलेले डी. एन. जाधव यांचा शाल श्रीफळ देऊन मालोजीराजे यांनी विशेष सत्कार केला.

यावेळी नाभिक समाजाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातून शेकडो समाज बांधव तसेच नाभिक समाजातील विविध संघटनांचे तसेच संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.